पुणे : दुधाच्या अनुदानावरुन दुध व्यावसायिक संघ आता चांगलेच अक्रमक झाले आहेत. सरकारनं दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान घोषित केले होते, मात्र ते अनुदान दूध संघांना अद्याप मिळालं नसल्यानं पुन्हा प्रश्न निर्माण झालाय. अनुदानासाठी राज्य सरकारला येत्या 6 तारखेपर्यंत अल्टीमेटम देण्यात आलाय. अन्यथा अकरा तारखेपासून पंचवीस रुपयानं दुध खरेदी बंद करण्याचा इशारा दुध व्यावसायिक संघांनी दिला आहे.
राज्य सरकार दुधाचे अनुदान देण्यास चालढकल करत असल्याचा आरोपही दुध संघांनी केलाय. दुधाच्या थकीत अनुदाना संदर्भात दुध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची आणि विभागीय दुग्ध विकास अधिकारी यांच्यात शनिवारी पुण्यात बैठक झाली.
या बैठकीला गोकूळ, वारणा, राजारामबापू, डायनॉमीक्स, सोनाईसह अनेक दुध उत्पादक संघांची उपस्थिती होती. सरकारकडे दुधाचे पन्नास दिवसाचं साधारण 180 कोटी अनुदान थकलय,मात्र सरकार ते देण्याबाबत चालढकल करीत असल्याचा आरोप दुध व्यावसायिक संघांनी केलाय.