फैजपूरच्या अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय
फैजपूर- दुध उत्पादकांना संस्थेच्या व्यापारी नफ्यातून बक्षीस, भावफरक , बोनस, डिव्हिडंट देणार असल्याचा फैजपूर येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. फैजपूर येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. संस्थेचे चेअरमन हेमराज चौधरी अध्यक्षस्थानी होते. विषय पत्रिकेवर 15 विषय घेण्यात आले होते. या सर्व विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. संस्थेचे कार्य चांगले असल्याने प्रगतीपथावर आहे .या दूध उत्पादक संस्थेची सभासद संख्या 325 इतकी आहे. दूध उत्पादकांकडून प्रति दिन तीन हजार लिटर दुध पुरवठा होतो तर संस्थेकडून सभासदांच्या गुरांना मोफत लसीकरण दिले जाते दूध उत्पादक यांच्या कडून मिळणार्या सहकार्यामुळे या संस्थेकडून दूध उत्पादकांचे हित साधले जाते. संस्थेला मिळालेल्या नफ्यातून 29 जुलै रोजी झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 22 लाख 59 हजार व्यापारी नफ्याच्या रकमेतून संस्था दूध उत्पादकांना बक्षीस, भावफरक , बोनस व डिव्हीडंट यासाठी 18 लाख 25 हजार रुपये वितरीत करणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय या सभेत घेण्यात आला. व्यासपीठावर चेअरमन हेमराज चौधरी, व्हा.चेअरमन नितीन राणे, ज्येष्ठ संचालक भास्कर चौधरी, समशेर तडवी, चंद्रशेखर चौधरी, कमलाकर भंगाळे, डिगंबर कोल्हे, मोहन वायकोळे, रमेश झोपे, जितेंद्र भारंबे, अजय महाजन, लक्ष्मण झांबरे, उमाकांत भारंबे, अप्पा भालचंद्र चौधरी, विनोद चौधरी, विजय पाटील, वंदना कमलाकर चौधरी, ज्योत्स्ना मोतीराम भारंबे, सेक्रेटरी सुनील क्षत्रिय उपस्थित होते.
संस्थेच्या प्रगतीत दुध उत्पादकांचा सिंहाचा वाटा -चेअरमन
संस्था प्रगतीपथावर असल्यामागे संचालक मंडळ व दुध उत्पादकांचा सिंहाचा वाटा आहे त्यासाठी दुध उत्पादकांचे हित जोपासून संस्थेला मिळालेल्या व्यापारी नफ्यातून बक्षिस, संस्था भाव फरक, बोनस व डिव्हीडंट देण्याचा निर्णय घेतल्याचे चेअरमन अंबिका दूध संस्थेचे चेअरमन हेमराज चौधरी म्हणाले.