दुपारनंतर मतदान केंद्रावर शुकशुकाट !

0

नंदुरबार। आज महराष्ट्रात अंतिम आणि चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेला मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात मतदानाला मोठा प्रतिसाद लाभला मात्र दुपारपासून मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने मतदार दुपारी मतदानाला बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. दुपारी सारंगखेड्यातील मतदार केंद्रावर शुकशुकाट दिसून आला.