दुपारपर्यंत ३०० हून अधिक तरुण-तरुणींची झाल्या मुलाखती

0

जळगाव – खान्देश एज्यूकेशन सोसायटीच्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या जॉब फेअरला चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत ३०० हून अधिक तरुण-तरुणींनी वेगवेगळया कंपनीच्या मुलाखती दिल्यात. परीसरात आलेल्या सर्व तरुण-तरुणींना तांत्रिक अडचणी सोडविण्यात येत होत्या. बाहेरगावाहून आलेल्या तरुण-तरुणींसाठी वाहनाची पार्कींगची सुविधा महाविदयालयाच्या बाजूच्या पटांगणात करण्यात आली आहे. आज आयोजित जॉब फेअरमध्ये जवळपास ३५ हून अधिक कंपनींनी मुलाखती घेतल्या.