दुबईच्या पोलीस खात्यात ‘रोबोकार’

0

दुबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरच नव्या प्रकारच्या अत्याधुनिक गाड्या येणार आहे. त्या गाडी स्वयंचलित ‘रोबोकार’ म्हणून ओळखल्या जाणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस या गाड्या दुबई पोलिसांना मिळणार आहेत. या आठवड्यातच अशी घोषणा करण्यात आली. हे रोबोकार इंग्रजी आणि अरबी भाषेेत संवाद साधतात, लवकरच या गाड्या अन्य चार भाषाही बोलणार आहेत.

या रोबोकारच्या साहाय्याने अतिजलद धावणार्‍या गाड्यांचा पाठलाग करून त्यांना पकडणे तितकेसे शक्य होणार नाही. प्रदर्शनामध्ये या रोबोकार यांची गती लक्षात आली नाही. परंतु चारचाकी रोबोकारच्या मदतीने हवाई क्षेत्रात होणार्‍या गुन्ह्यांचा आणि त्यामागील गुन्हेगारांना ओळखणे शक्य होणार आहे. या गाड्या एकाच खोली बसून चालवणे शक्य होणार आहेत. सिंगापूरच्या ओटीएसडब्लू रोबोकार्सच्या निर्माता कंपनीचा दावा आहे की, पूर्ण जगात यासारख्या गाड्या पहिल्याप्रथम बनवल्या गेल्या आहेत. दुबई पोलीस आणि ओटीएसडब्लूने म्हटले आहे की, रोबोकारचा वापर पोलीस अधिकार्‍यांच्या ठिकाणी केला जाणार नाही. मात्र, त्यांच्या मदतीने पोलीस विभाग इतर प्रकारे करू शकणार आहे. तसेच या गाड्या 24 तास तत्पर असणार आहेत, या गाड्या स्वतः स्वतःला चार्ज करू शकणार आहेत.