नवी दिल्ली- हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याला दुबईतून ताब्यात घेण्यात यश आले आहे, असे असले तरी या प्रकरणात आता मिशेलच्या वकिलांनी नवा आरोप केला आहे. दुबईने त्यांच्या राज्यकन्येच्या मोबदल्यात मिशेलला भारताच्या ताब्यात दिले, असा दावा वकिलांनी केला असून हे प्रकरण आता संयुक्त राष्ट्रापुढे नेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्ललँड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेला दलिल ख्रिस्तियन दलाल यांना दुबईत अटक करण्यात आली होती. संयुक्त अरब अमिरातीतून प्रत्यार्पण करण्यात आल्यानंतर डिसेंबर महिन्यात मिशेलला भारतात आणण्यात आले होते.