नाशिक । नाशकातील साठेबाज कांदा व्यापार्यांनी दुबई हवालामार्फत ‘काळ्याचं पांढरं’ केल्याचा संशय निर्माण झाला आहे. दुबईतून कांदा निर्यातीच्या नावाखाली फक्त पैसे आणले गेले, कांदे निर्यात झालेच नसल्याचा संशय ईडीला आहे.तीन टक्के व्याजदरानं पैसे देण्याचा उद्योगही काही जण करत असल्याचं तपासात उघड झालं आहे. नाशकातील सात बड्या व्यापार्यांनी कांद्याची साठेबाजी करत कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप आहे.
20 अधिकार्यांकडून झाडाझडती
प्रशासनाच्या तंबीनंतर कांदा व्यापार्यांनी उद्यापासून पुन्हा व्यवहार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आयकरच्या धाडींविरोधात तीन दिवसांपासून कांदा बाजार बंद होते. नाशिक शहर आणि जिल्ह्यात कांद्याच्या व्यापार्यांवर छापेमारी सुरु झाली आणि कांद्याचे घाऊक बाजारातील दर 35 टक्क्यांनी घसरले. नाशिक जिल्ह्यात 20 अधिकार्यांच्या पथकाकडून 7 व्यापारी, 25 घरं, गोदामं आणि कार्यालयाची झाडाझडती करण्यात आली. साठेबाजी करुन कांद्याचे दर वाढवणार्या व्यापार्यांना वेसण घालण्यासाठी ही कारवाई केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसात मुंबईत कांद्यानं तिशी गाठली. पण शेतकर्यांना फक्त 15 रुपयांचा दर मिळायचा. मधलं कमिशन व्यापारी लाटायचे. साठेमारी करुन कांद्याचे दर वाढवण्यात व्यापार्यांचा हात असल्याचा आरोप आहे.