दुबई ओपनमध्ये उपांत्य फेरीत पोहोचले बोपन्ना-माटकोव्हस्की

0

दुबई: दुबई ड्युटी फ्री खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष गटात भारताचा रोहन बोपन्ना आणि पोलंडचा त्याचा जोडीदार मार्गिन माटकोव्हस्की यांनी दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. बोपन्ना-माटकोव्हस्की या बिगर मानांकित जोडीने हार्डकोर्ट स्पर्धेत उपांत्यपूर्व लढतीत रोमानियाचा फफ्लोरिन मार्जिया आणि सर्बियाचा व्हिक्टर ट्रोइस्की यांच्यावर ६-३, ६-४ ने विजय दणदणीत विजय मिळवला. बोपन्ना-मोटकोव्हस्की यांनी पहिल्या फेरीत इव्हान डोडिंग-मार्सेल ग्रॅनोलर्स यांच्यावर ५-७, ६-३, ११-९ ने विजय नोंदविला होता. उपांत्य झेरीत बोपन्ना-मोटकोव्हस्की यांची लढत लियांडर पेस-गुलेर्मो लोपेझ यांच्याविरुद्ध होईल. त्याआधी पेस-लोपेझ यांना उपांत्यपूर्व फेरीत कॅनडाचा डॅनियल नेस्टर आणि स्पेनचा त्याचा साथीदार एडुआर्ड व्हेसलिन यांच्याविरुद्ध दोन हात करावे लागतील. एकेरीत एकही भारतीय शिल्लक नाही. बोपन्नाची या मोसमातील ही दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. सुरुवातीला त्याने सहकारी जीवन नेदुचेझियनसोबत चेन्नई ओपनचे जेतेपद पटकविले होते.

दुबई चॅम्पियनशिपमधून फेडरर बाहेर
ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन रोजर फेडरर पराभूत झाल्याने दुबई चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 18 ग्रॅण्ड स्लॅम जिंकलेल्या स्विर्झलँडच्या खेळाडू फेडररला रशियाच्या अ‍ॅवेगेनी डोनेस्कीने कडवी झुंज देत पराभूत केले. जागतिक क्रमवारीत 116व्या क्रमांकवर असलेल्या डोनस्कीने नवव्या क्रमांकावर असलेल्या फेडररला 3-6, 7-6(9/7), 7-6(7/5) असे पराभूत करत क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश मिळविला आहे. या सामना तब्बल दोन तास रंगला होता. 2007 नंतर ही तिसरी वेळ आहे जेव्हा फेडररला क्वॉलिफायर सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत फेडररने सहज विजय मिळविला होता. फेडररने फ्रान्सचा खेळाडू बेनोईट पाईरला दोन सेटमध्ये पराभूत करत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला होता. फेडररने पाइरेला 6-1, 6-3 असे पराभूत केले होते.