दुबई चेंबरचे कार्यालय लवकरच मुंबईत

0

मुंबई । द दुबई चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री भारतातील आपले पहिले कार्यालय मुंबईमध्ये या वर्षाखेरपर्यंत सुरू करण्याचा विचार करत आहे. या संदर्भात दुबई चेंबरचे अध्यक्ष एच. ई. माजिद सैफ अल घुरैर आणि यूएईचे राजदूत डॉ. अहमद अल बन्ना यांच्या अध्यक्षतेखालील दुबई चेंबरच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतलीफ या भेटीतदुबई आणि भारत यांच्यादरम्यान चांगले व्यापारी संबंध आणि भागीदारी निर्माण होऊन ते वृद्धिंगत यावेत, याबद्दल चर्चा करण्यात आली. द दुबई चेंबरचे कार्यालय मुंबईत सुरू करण्याच्या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दर्शवल्याचे दुबई चेंबरने सांगितले.