दुबई । दुबई टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासह यंदाच्या हंगामातील पहिलेवहिले जेतेपद जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अँडी मरेने पटकावले. मरेच्या कारकीर्दीतील हे 45 वे जेतेपद आहे. अंतिम लढतीत मरेने स्पेनच्या फर्नाडो व्हर्डास्कोवर 6-3, 6-2 अशी मात केली.
या स्पर्धेचे माझे हे पहिलेच जेतेपद आहे. त्यामुळे प्रचंड आनंद झाला आहे’, असे मरेने सांगितले.या विजयासह मरेने व्हर्डास्कोविरुद्धची कामगिरी 13-1 अशी सुधारली.‘मी संथ सुरुवात केली. मात्र लय गवसल्यानंतर चांगला खेळ करू शकलो आणि विजय साकारला. स्पर्धेच्या 25 वर्षांच्या इतिहासात जेतेपद पटकावणारा मरे इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. शेवटच्या 8 पैकी 7 स्पर्धामध्ये मरेने अंतिम फेरी गाठली आहे. पाच वर्षांपूर्वी अंतिम लढतीत रॉजर फेडररविरुद्ध मरेला पराभवाला सामोरे जावे लागले होते.