मुक्ताईनगर। शेतकर्यांनी पहिल्या पावसानंतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार व पावसाची चिन्हे दिसल्यानंतर शेतकर्यांनी 70 टक्के धुळ पेरणी केलेली होती. परंतु पावसाने गेल्या महिनाभरापासून दडी मारल्यामुळे धुळ पेरणी केलेले खते व बियाणे संपुर्णपणे वाया जावून आर्थिक झळ बसली आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी खते व बियाणे मोफत पुरविण्याची मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे.
शेतकर्यांना दिलासा द्यावा
पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. या शेतकर्यांच्या संकटाची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, जिल्हा चिटणीस राजेंद्र माळी, योगेश कोलते, शुभांगी भोलाणे, उपसभापती प्रल्हाद जंगले, ताहेर खान पठाण, तालुका सरचिटणीस सतीष चौधरी, डॉ. बी.सी. महाजन, संदीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, जयपाल बोदडे, गुणवंत पिवटे, विकास पाटील, सुनिल काटे, सरपंच ललित महाजन, शहराध्यक्ष मनोज तळेले, शेषराव पाटील, कैलास पाटील, चंद्रकांत भोलाणे, जावजी धनगर, अश्विन घोघरे, राजेंद्र दुट्टे, अश्विन कोळी, प्रदीप साळुंके, विनोद पाटील, जितेंद्र पाटील, विजय भंगाळे, राजेंद्र पाटील, शांताराम गव्हाळ यांच्या स्वाक्षर्या आहेत.