दुभंगलेल्या गणेश मुर्ती आणि प्लास्टिक संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0

चाळीसगाव – भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून सर्वत्र साजरी करण्यात येत असते,शहरात हा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येत असतो. यात शहरात अनेकविध ठिकाणी मुर्ती व्यावसायिक दुकाने थाटली जातात, यात गणपतीच्या मुर्त्यांची व आरास साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते यात अनेकदा विक्री झाल्यानंतर स्थानिक दुकानदार जागेवर दुभंगलेल्या मुर्ती टाकून पलायन करतात तर प्लास्टिक साहित्याची योग्य रितीने विल्हेवाट न करता पळ काढतात.

गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सतत पहावयास मिळत असून यात प्लास्टिक एकत्र जमा करुन व दुभंगलेल्या मुर्त्यांचे अवशेष एकत्रित करुन आमच्या वतीने विधीवत विसर्जन करण्यात येत आहे,पुनश्च हा प्रकार घडू नये म्हणून आपल्या स्तरावरुन संबंधित विक्रेत्यांना नोटीस काढण्यात यावी जेणेकरुन दुभंगलेल्या मुर्त्यांची विटंबना होणार नाही तसेच दुकान परिसरालगत असलेल्या प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावली जावी.

निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
प्रत्येक मनुष्य स्वकर्तव्यासोबत काही सामाजिक देणं लागतो म्हणूनच एक सामाजिक भान जोपासण्यासाठी व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा तसेच पर्यावरणातील घडामोडी संस्कृतीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींचा विचार करावा यास विनाशाचे गालबोट लागता कामा नये हे समाजभान बाळगित प्रत्येकाने गणेशोत्सव आनंदात आणि पर्यावरणपूरक असा साजरा करण्यात यावा, अशा आशयाची मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्याकडे पर्यावरण प्रेमींच्या वतीने करण्यात आली आहे. यात स्वप्निल कोतकर, प्रविण बागड, मनीष मेहता, हेमंत वाणी, स्वप्नील धामणे, भुपेश शर्मा, निशांत पाठक, गितेश कोटस्थाने, विशाल गोरे, गणेश सुर्यवंशी, सतीश जैन, निलेश जैन, योगेश ब्राह्मणकर, युवराज शिंपी, पियुष सोनगिरे, निशांत पाठक, निलेश वाणी, मनोज पाटील, संदीप मगर आदी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.