चाळीसगाव। गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. परंतू याच परिसरात खरेदी करते वेळी अथवा ने-आण करतेवेळी अनेक गणेश मुर्ती दुभंगल्यात तसेच विक्री न झालेल्या मुर्ती उघड्यावर सोडून गेले. त्यामुळे वाद निर्माण होऊन विपरीत घटना घडण्याची दाट शक्यता होती. याची दक्षता घेत, जलसाक्षर अभियानाच्या वतीने विधीवत विसर्जन करण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत लगबग
मूर्ती ठरवण्यासाठी आबालवृद्धांची तसेच महिला भगिनींची रात्री उशिरापर्यंत पोलिस कवायत मैदान परिसर, शिवाजी चौक परिसरात गर्दी दिसून येत होती. आकर्षक सजवलेली वाहने, पारंपरिक वाद्यांचा गजर, नेत्रदीपक प्रकाश यंत्रणा आदी जल्लोषी वातावरणात गणेश आगमनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
परिसरात प्लास्टिक कचर्याची विल्हेवाट न लावल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. दुभंगलेल्या मूर्तींच्या विसर्जनावेळी स्वप्नील कोतकर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी, शहर उपाध्यक्ष निरज अजबे, गौरव निरखे, भिकन गवळी, राजेंद्र गवळी, स्वप्नील येवले, भैय्या मोरे, अतुल पाटील आदी उपस्थित होते.