दुभाजकाला धडकून कार चालकाचा मृत्यू

0

तळेगाव : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे गावच्या हद्दीत दुभाजकाला धडकून मारुती झेन कारचा सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुण्यवान बबन शिंदे (28, रा. मावळ) असे मयताचे नाव आहे. शिंदे आपल्या मारुती झेन कारने हा महामार्गावरून शिवणे गावी जात असताना सोमाटणे गावच्या हद्दीत सतीश कार्गो येथे भजनसिंग ढाब्याजवळ दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला जाऊन खड्डयात पडला. अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.