जळगाव । सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन सभा, व्याख्यान, प्रतिमा पूजन, निबंध स्पर्धा आणि भव्य मिरवणूक अशा विविध उपक्रमांनी शनिवारी 14 रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. चोहीकडे ‘जयभीम’ची गर्जना दुमदुमल्याची दिसून आले. प्रमुख रस्ते, चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यामुळे वातावरण निळेमय झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्था-संघटनांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. जळगाव शहरासह जिल्ह्याभरात ठिकठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आलेली होती. तत्पूर्वी मध्यरात्री डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
चाळीसगाव नगरपरिषदेतर्फे जयंती
चाळीसगाव । शनिवारी 14 रोजी नगरपरिषदतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आली. यावेळी नगरसेविका विजया पवार, विजया भिकन पवार, वत्सलाताई महाले, रंजनाताई सोनवणे, मानसिंग राजपूत, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वास चव्हाण, राजेंद्र गवळी, भिकन पवार यांच्यासह सर्व विभागप्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी सविता राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले.
शहर पोलीस ठाण्यात अभिवादन
चाळीसगाव । शहर पोलीस स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु रसेडे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, युवराज रबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हवालदार धर्मराज पाटील, मधुकर पाटील, राजेंद्र चौधरी, पोलीस नाईक गणेश पाटील, भगवान उमाळे, गणेश सुर्यवंशी, पो.कॉ.अजय भोई, शांताराम पवार, सुनिल राजपूत, संदीप पाटील आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
करंजगाव येथे वैज्ञानिक दृष्टीकोनावर व्याख्यान
चाळीसगाव । डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुरल डेव्हल्पमेंट सेंटर खान्देश करंजगावच्या विद्यमाने, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती निमित्ताने जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर व्याख्याते सागर नागणे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाची जडणघडण भारतीय संविधानाचा प्रवास तसेच मानवी जीवनातील भारतीय संविधानाचे महत्व आपल्या बोलण्यातून अधोरखीत केले तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? मानवी जीवनातील वैज्ञानिक दृष्टिकोनात महत्व विविध पैलू नि मांडले तसेच भारतीय समाज सशक्त करण्यासाठी संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व सांगितले.
एरंडोलात विविध कार्यक्रमांनी जयंती साजरी
एरंडोल । येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांधीपुरा येथे लहान मुलांनी केक कापुन जयंती उत्सव साजरा केला. सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या पदधिकार्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासुन भव्य मोटर सायकल फेरी काढण्यात आली. आंबेडकर चौकात श्रीधर गायकवाड यांनी पत्नी कोकीळाबाई गायकवाड यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या प्रवेश द्वाराचे उद्घाटन भाजपचे विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्ष रमेश परदेशी, तहसीलदार सुनिता जर्हाड, उपनगराध्यक्षा छाया दाभाडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे, उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रवींद्र महाजन, किशोर निंबाळकर, दशरथ महाजन, अशोक चौधरी, नगरसेवक प्रा.मनोज पाटील, डॉ.सुरेश पाटील, नितीन महाजन, डॉ.नरेंद्र ठाकुर, नरेंद्र पाटील, कृणाल महाजन, माजी नगरसेवक शालिग्राम गायकवाड, जगदीश ठाकुर, आनंद दाभाडे, डॉ.अतुल सोनवणे, अतुल महाजन, विजय महाजन, अमित पाटील, प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील, आनंद संदानशिव, प्रमोद महाजन, विठ्ठल आंधळे, प्रा.रणजीत मोरे आदी उपस्थित होते.
कजगाव येथे प्रतिमा पूजन
भडगाव । तालुक्यातील कजगाव येथील सावता माळी चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच पुंडलिक सोनवणे, जयबजरंग दूध सोसायटीचे चेअरमन किशोर महाजन, माजी उपसरपंच भानुदास महाजन, नितिन सोनार, नाना चौधरी, सागर जाधव, पंडित मोरे, श्याम अहिरे, दत्तू चव्हाण, मंगेश चव्हाण, भगवान इंगळे, आबा महाजन, रावण भालेराव, मनोज पवार, पोपट महाजन, जयराम माळी, दिपक जाधव, एकनाथ खैरनार, दादू महाजन, बापू सोनवणे, विशाल सोनवणे, सागर महाजन, किशोर महाजन आदी उपस्थित होते.
नांद्रा ग्रामपंचायततर्फे कार्यक्रम
नांद्रा । पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे ग्रा.प.मल्टिपर्पज हॉलमध्ये शनिवारी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वसंत मल्हारी साळवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी सरपंच शिवाजी तावडे, बापु सूर्यवंशी, पकंज बाविस्कर, सक्षम ब्राम्हणे, गोलु प्रविण खरे, प्रा.यशवंत पवार यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ग्रा.प.सदस्य साहेबराव साळवे, रविकांत सूर्यवंशी, नाना नाईक, माजी उपसरपंच सखाराम पाटील, दिलीप पाटील, संजय बाविस्कर, संतोष ब्राम्हणे, सुकदेव साळवे, राकेश साळवे, शंकर लोहार, ओम पवार, मनोज सूर्यवंशी, नाना सुर्यवंशी, गोलु सोनवणे, प्रविण खरे, माणिक लोखंडे, अभिमन खरे,दिलीप सोनवणे, भूरा साळवे यांच्या सह ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.यशवंत पवार यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक एस.एस.सत्रे यांनी मानले. तसेच जि.प.शाळेत देखील जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपशिक्षिका मोहिनी पाटील, रुपाली जैन, स्वाती पाटील, उर्मिला पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा
जळगाव । शनिवारी रोजी गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देत भाषणे, गीते तसेच कविता सादर केल्या. योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कल्पना तायडे तर आभार प्रदर्शन धनश्री फालक यांनी मानले.
बिलवाडी मराठी शाळा
जळगाव । तालुक्यातील बिलवाडी येथील जि.प.मराठी शाळेत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळेतील 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. उपशिक्षक संदिप पाटील, उपशिक्षिका तारावंती नन्नवरे, संदिप पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन संदिप पाटील व आभार अर्चना गोसावी यांनी मानले. प्रभारी मुख्याध्यापक सुखदेव पाटील, उपशिक्षक महेंद्र पाटील, विनोद नाईक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चोपड्यात सर्वपक्षीय मानवंदना
चोपडा । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 127 व्या जयंती निमित्त चोपड्यात विविध राजकीय, सामाजीक, पदाधिकार्यासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ,नगराध्यक्ष मनिषा चौधरी, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, विधानसभाचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, भाजपाचे जेष्ट नेता घनशाम अग्रवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदिप पाटील, चंद्रहासभाई गुजराथी, जि.प .सदस्य प्रा.निलिमा पाटील, उपनगराध्यक्ष सिमा श्रावगी, रंजना नेवे, तहसिलदार दिपक गिरासे, डिवाएसपी सदाशिव वाघमारे, नायबतहसिलदार अधिकार पेंढारकर, पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील, मुख्याधिकारी बबन तडवी, गोपाल सोनवणे, नगरसेवक आशोक बाविस्कर, रमेश शिंदे, जिवन चौधरी, महेश पवार, तिलक शहा, नरेंद्र पाटील, सतोष अहीरे, समाधान सपकाळे, संजय अहीरे, रविंद्र शिरसाठ, संजय बाविस्कर, उमेश नगराळे, अॅड.चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते. शहरातील शासकीय विश्रामगृह पासून मोटरसायकल रँलीला प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी चौक, ग्रामिण पोलीस स्टेशन, थाळनेर दरवाजा मार्गाने गुजराथी गल्ली ,गोलमंदिर, शनि मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोटरसायकल रँली संपुर्ण शहरात काढण्यात आली.
विवेकानंद विद्यालय
चोपडा। येथील विवेकानंद विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका रंजना दंडगव्हाळ, जेनिफर मथायस, ज्योती अडावदकर, पवन लाठी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आली. मुख्याध्यापक नरेंद्र भावे, उपशिक्षिक पवन लाठी, जावेद तडवी, राकेश विसपुते, प्रसाद वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले.
शेंदूर्णीतील गरुड विद्यालयात
शेंदूर्णी । येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.व्ही.डी.पाटील होते. प्रास्ताविक प्रा.एस.आर.पाटील यांनी केले. सौ.शिवपूजे, डी.बी.पाटील, डी.बी.म्हस्के यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन एस.ए.पवार यांनी तर आभार मुख्याध्यापक बी.जी.मांडवडे यांनी मानले. यावेळी डी.आर.शिंपी, प्रा.सी.पी.पाटील यांच्यासह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
लोंढवेत जयंती साजरी
अमळनेर । तालुक्यातील लोंढवे येथे स्व.आबासो एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन करून पुजन करण्यात आले. भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब यांचे साहित्य समाजातील प्रत्येक नागरिकाने आत्मसात करूण त्यांचे आचरण करावे. डॉ.बाबासाहेब यांचे कार्य देशाला महासत्ताकडे घेऊन जाईल असे लोंढवे येथील एस.एस.पाटील विद्यालयामध्ये अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर,कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनीं, उपस्थित होते.
रक्तगट तपासणी व गुणवंताचा सत्कार
अमळनेर। विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिमनगर ताडेपुरा येथे रक्तगट तपासणी शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मायाई बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार शिरिष चौधरी होते. यावेळी रणजित शिंदे, प्रांताधिकारी संजय गायकवाड, मायाबाई बहारे, गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्हाडे, प्रविण पाठक, किरण गोसावी, डॉ.हेमंत कदम ,डॉ.सुमित सूर्यवंशी, दिनेश सोनवणे, राजेंद्र चौधरी, विजय गाढे, डॉ.महेंद्र साळुंखे, विजय संदनशिव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्जुन संदनशिव, मनोज कंखरे, शांताराम सोनवणे, प्रविण बैसाणे, सारंग संदनशिव, भाग्यश्री पॅथॉलॉजी आदिंनी परिश्रम घेतले.
बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण करा
अमळनेर। भारतरत्न बाबासाहेब यांचे साहित्य समाजातील प्रत्येक नागरिकाने आत्मसात करूण त्यांचे आचरण करावे, बाबासाहेब यांचे कार्य देशाला महासत्ताकडे घेऊन जाईल असे देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये अध्यक्षीय भाषण करतांना मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब आबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, स्काऊट शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी, आय.आर.महाजन आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी एन.जी.देशमुख, संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केला. दरम्यान सरस्वती विद्यामंदिर शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रणजित शिंदे, आनंदा पाटील, संगीता पाटिल, गीतांजली पाटील, परशुराम गांगुर्डे, ऋषिकेश महाळपूरकर, धर्मा धनगर आदी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकर यांच्या जीवनचरित्र्याचा माहितीपट व सत्यशोधक नाटक दाखविण्यात
आले.
धानोरा येथे जयंती उत्साहात
धानोरा । येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग व पाटील कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच कै.सुशीलाबाई हिरालाल गुजर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच किर्तीताई पाटील, मुख्याध्यापक के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक ए.एम.पाटील, पर्यवेक्षक बी.डी.पाटील, जगदीश पाटील, योगेश पाटील, के.पी.बडगुजर, ए.पी. खेरनार, उषा भिल, आर.बी.साळुंखे, मिलिंद बडगुजर, चेतन चौधरी, सी.बी.सोनवणे, वासुदेव महाजन, मच्छिंद्र महाजन, दीपक महाजन, योगिता बाविस्कर, एकता भामरे, रेखा महाजन, डिगंबर सोनवणे, एस.एस.पाटील, किरण पाटील, वासुदेव महाजन, सावन महाजन, पन्नालाल गुजर, संदीप गुजर, डिगंबर सोनवणे, मच्छिंद्र महाजन, ए.पी.शिरसाठ, जयेश चौधरी, अनिल निभोरे, डिगांबर सोनवणे, आकाश खैरे, नरेंद्र चौधरी, वर्षा चौधरी, विलास सोनवणे आदी उपस्थित होते. ए.पी. सिरसाट यांनी वाचनालयास 1 हजार रुपयांची पुस्तके भेट दिली. सूत्रसंचालन सावन महाजन यांनी आभार जयेश चौधरी यांनी मानले.