दुय्यम निबंधकाची दोन महिन्यात चौकशी करणार

0

मुंबई | परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे मार्च २०१३ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत कार्यरत असलेल्या दुय्यम निबंधकाची दोन महिन्यात चौकशी करून त्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.

तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी ३० डिसेंबर २०१५ रोजी तक्रार आली होती. त्या तक्रारीनुसार संबंधितांविरूध्द महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार विभागीय चौकशी सुरू आहे. ही चौकशी लवकरात लवकर म्हणजे येत्या दोन महिन्यात पूर्ण करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.