तळोदा । शासनाने नागरीकाची सोय व्हावी या हेतूने विविध शासकीय कार्यालये एका ठिकाणी असावीत या हेतूने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लाखो रूपये खर्च करून एक तीन मजली प्रशासकीय मध्यवर्ती इमारत बांधली आहे. याठीकाणी विविध शासकीय कार्यालये सुरु असून याला दुय्यम निबंधक कार्यालय मात्र अपवाद आहे. सदरचे कार्यालय आज सुध्दा शहरातील जुन्या पोष्ट ऑफीस गल्लीत एका भाडयाच्या घरात सुरु आहे. एकीकडे प्रसाकीय इमारतीत सदर कार्यालयास तिसर्या मजल्यावर जागा देण्यात आले असले तरी प्रशासकीय इमारतीत जाण्यास या कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी नाखुष असल्याचे समजते.
दीड वर्षांपासून कार्यालय सुरू
ज्या ठिकाणी हे कार्यालय सुरु आहे त्याठीकणी वेंडर लोकांना बसण्याची व्यवस्था नाही, रवरेदीखत, बोझानोंद करण्यासाठी,गहाण खत, बक्षिसपत्र करण्यासाठी आलेल्या नागरिकांना साठी बसण्याची किंवा उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नसतांना गेल्या दिड दोन वर्षांपासून यांच ठीकाणी हे कार्यालय सुरु आहे. या कार्यालयाची कामकाजाची वेळ इतर शासकीय कार्यालयाच्या वेळेप्रमाणे म्हणजे सकाळी 10.30 ते 5.30 असा असतो परंतू या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळवर उपास्थित नसतात
अधिकार्यांचे दुर्लक्ष
यामुळे नागरीकांना आपल्या कामांसाठी हेलपटे घालावे लागतात. शनिवारी सब रजिष्ट्रार कार्यालयात नसता इतर वेळी साहेब असतात तर संगणक तंज्ञ राहत नाही त्यावेळस रजिष्ट्रार साहेब म्हणतात संगणक तंत्रज्ञ नाही तर मी काय करू ? असे म्हणून लागतात. दुय्यम निबंधक कार्यालय हे इतर कार्यालयांपासून दूर असल्याने वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष होते. यामुळे कार्यालयच्या बेशिस्तपणे सुरु असलेल्या कांमकाजावर पांघरूण पडते.
भाडे वसूल करा
तसेच हे कार्यालय प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत न नेणार्या अधिकार्याकडून भांडे का वसूल का करू नये अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकवयास मिळत आहे. दरम्यान, नुकतीच सब रजिष्ट्रार यांना वरिष्ठ अधिकार्यांकडून दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये हलवण्याचा कडक सूचना वरिष्ठ अधिकार्यांनी केल्या आहेत. दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासकीय मध्यवर्ती इमारती सुरु झाल्यास अनागोंदी कारभारास चाप बसेल व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहील व नागरिकांचा कामे वेळेवर होतील.