दुरंतो एक्सप्रेस मध्ये राडा ; आर.पी.एफ कडून सी.टी.आय. ला मारहाण

भुसावळ प्रतिनिधी दि 29

मुंबई वरून प्रयागराज कडे जाणाऱ्या दुरंतो एक्सप्रेस मध्ये बिना तिकीट प्रवास करणारे रेल्वे सुरक्षा बल (आर.पी.एफ) विभागाचे कर्मचारी ए. के. अजमेरा हे सह पत्नी मुंबई ते सतना प्रवास करीत होते. मुंबई स्टॉपचे सी. टी. आय. मनोज सिन्हा यांनी यात्रीस तिकीट विचारले असता त्यांच्या जवळ कुठलाही पास तसेच तिकीट नव्हते यांचा राग आल्याने ए. के. अजमेरा यांनी सी. टी. आय. मनोज सिन्हा यांच्या सोबत अरेरारी भाषेत बोलून इगतपुरी दरम्यान सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान दुरंतो एक्सप्रेस मध्ये राडा करीत मारहाण करुन वे ठार मारण्याची धमकी दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

माहिती अशी की, दिनांक २६/८/२०२३ रोजी ट्रेन नंबर १२२९३ दुरंतो एक्सप्रेस ही मुंबई वरून प्रयागराज कडे जात असतांना ए.सी. सेकंड मध्ये सी.टी.आय. मनोज सिन्हा हे तिकीट तपासणी करीत असतांना दुरंतो एक्सप्रेस बिना तिकीट प्रवास करणारे रेल्वे सुरक्षा बल विभागाचे ए. के. अजमेरा राहणार सतना हे सह पत्नी प्रवास करीत असतांना त्यांना राग आल्याने सी. टी. आय. मनोज सिन्हा यास सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली.

 

” रेल्वे सुरक्षा बल विभागाचे ए. के. अजमेरा सी.टी.आय. मनोज सिन्हा यांना म्हणाले की, जर माझ्याकडे बंदूक असती तर जागेच गोळी मारली असती अशी धमकीही दिली. तसेच एस. कोच सेकंड मध्ये ट्रेन कोच वेटर जेवण घेऊन जात असतांना त्यास सी.टी.आय.मनोज सिन्हा यास रेल्वे सुरक्षा बल विभागाचे ए.के. अजमेरा हा मारहाण करीत होता यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेले रामदयाल तिवारी यांना सुद्धा ए. के. अजमेरा यांनी मारहाण केली.” सदरील घटना ही इगतपुरी दरम्यान घडली. दुरंतो एक्सप्रेस हा मुंबई वरून भुसावळला थांबत असल्याने सदरील घटने बाबत सिनियर डी.सी.एम तसेच कँटोल व रेल्वे सुरक्षा बल विभागाला माहिती कळविली. दुरंतो एक्सप्रेस ही भुसावळ फलाटांवर पोहचताच आय.आर.टी.सी.एस.ओ. युनियन व चेकिंग स्टॉफचे असे २०० कर्मचारी यांनी घटनेचा निषेध करीत घोषणाबाजी केली. यादरम्यान रेल्वे सुरक्षा बल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपी ए.के. अजमेरा व त्यांच्या पत्नीस वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच दबत आणला मात्र कुठल्या दबावाला बळी न पडता आय. आर. टी सी.एस.ओ.युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सी.टी.आय.मनोज सिन्हा यांना लोहमार्ग पोलीस स्टेशन भुसावळ नेले व झालेल्या घटने संदर्भात माहिती दिल्यावरून (दिनांक २७) रोजी रात्री बारा वाजेच्या दरम्यान लोहमार्ग पोलीस स्टेशन भुसावळला आर. पी. एफ. विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.