दुरबुङ्या येथे पोलिसांवर हल्ला

0

शिरपूर :- तालुक्यातील दुरबुङ्या येथे शिरपूर तालुका पोलिस स्टेशनच्या पोलिसांवर ग्रामस्थानी हल्ला केल्याची घटना आज दुपारी एक वाजता घडली. या हल्ल्यात पोलिस उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तालुक्यातील दुरबुङ्या येथील एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

याबत चौकशी साठी पोलिस गेले असता तेथील काही ग्रामस्थानी दगङफेक करुन लाठ्या काठ्यानी पोलिसावर जबर हल्ला चढविला. यात पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावीत सहाय्यक पोलिस निरीक्षक किरणकुमार खेङकर पोलिस कर्मचारी सजंय संभु नगराळे श्यामसिंग करमा वळवी अनंत भानुदास पवार यमुना परदेशी हे जखमी झाले आहेत.