भुसावळ । टिटवाळ्याजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक 48 तासानंतरही विस्कळीतच आहे. पहिल्या दिवशी मंगळवारी भुसावळ विभागातून जाणार्या तब्बल 17 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यानंतर दुसर्या दिवशीही बुधवारी 21 तर गुरुवारसाठी तीन गाड्या मिळून एकूण 24 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे. दरम्यान, खान्देशची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या भुसावळ-मुंबई व मुंबई-भुसावळ या दोन्ही पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांना मोठाच आर्थिक फटका बसला आहे.
भुसावळ विभागातील या गाड्या झाल्या रद्द
11093 सीएसटी-वाराणसी (महानगरी), 17617 मुंबई-नांदेड (तपोवन), 22101 मुंबई-मनमाड (राज्यराणी), 12109 सीएसटी-मनमाड (पंचवटी), 12117 एलटीटी-मनमाड (गोदावरी), 12139 सीएसटी-नागपूर (सेवाग्राम), 12289 एसएसटी-नागपूर (दुरांतो), 22102 मनमाड-मुंबई (राज्यराणी), 12110 मनमाड-मुंबई (पंचवटी), 12118 मनमाड-एलटीटी (गोदावरी), 11023 भुसावळ-पुणे (हुतात्मा), 12645 एलटीटी-गुवाहाटी, 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर, 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर, 12859 मुंबई-हावडा (गीतांजली), 22511 एलटीटी-कामाख्या (कर्मभूमी), 12168 वाराणसी-मुंबई, 12106 एलटीटी-लखनौ, 12290 नागपूर-मुंबई (दुरांतो), 13202 एलटीटी-राजेंद्रनगर (जनता),11061 एलटीटी-मुजफ्फरपूर (पवन) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तीन गाड्या केवळ नागपूरपर्यंत धावणार
मुंबई जाणार्या तीन रेल्वे गाड्या केवळ नागपूरपर्यंत धावणार आहेत. त्यात 18030 शालिमार-नागपूर, 12809 डाऊन हावडा-नागपूर व 12810 नागपूर-हावडा या गाड्यांचा समावेश आहे. तर 31 रोजी रद्द झालेल्या गाड्यांमध्ये 12167 एलटीटी-वाराणसी व 17617 सीएसटी-नांदेड (तपोवन), 22865 एलटीटी-पुरी या तीन गाड्या 31 रोजी रद्द झाल्या आहेत.
नियोजन कोलमडले, प्रवाशांचे हाल
गणेशोत्सवामुळे मुंबईसह पुण्यात हजारो भाविक दरवर्षी खान्देशातून जातात त्यासाठी आधीच प्रवासाचे आरक्षण करण्यात आले होते मात्र दुरांतो अपघातामुळे प्रवाशांचे नियोजन बिघडले आहे शिवाय भुसावळ ते नाशिक दरम्यान नोकरीनिमित्ताने जा-ये करणार्यांसह व्यापारी व अन्य प्रवासीवर्गाचे अतोनात हाल होत आहेत. बुधवारी अप-डाऊन मार्गावरील पॅसेंजरही रद्द करण्यात आल्याने खान्देशातील प्रवाशांना सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागले. रेल्वे प्रशासनाने भुसावळसह मनमाड स्थानकावर चौकशी कक्ष उघडला असून तिकीटांच्या पैशांचा परतावा सुरू केल्याचे सांगण्यात आले.