दुरांतो एक्सप्रेसवर चोरट्यांचा दरोडा, प्रवाशांचे दागिने, पैसे लांबवले

0

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत दुरांतो एक्सप्रेसवर चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. दुरांतो एक्सप्रेस जम्मूहून दिल्लीला येत असताना बादलीजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास हि घटना घडली.

दुरांतो एक्सप्रेस (12266)च्या सिग्नल यंत्रणेत चोरट्यांनी बिघाड केला. त्यानंतर एक्सप्रेसच्या बी-3 आणि बी-7 या बोगीतील प्रवाशांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाइल, दागिने आणि रोकडसह इतर वस्तू लुटून पोबारा केला. चोरट्यांची संख्या पाच ते दहा असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी प्रवाशांच्या तक्रारीवरुन सराय रोहिला स्टेशन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक दिनेश गुप्ता यांनी सांगितले.