अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी ; रावेरला शांतता कमेटीची बैठक
रावेर- आगामी दुर्गोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अन्यथा कुणी कायदा मोडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी रावेर येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले. या बैठकीला पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, महावितरणचे योगेश पाटील, उपनगराध्यक्ष अॅड.सुरज चौधरी, नगरसेवक असदुल्ला खान, आरोग्य निरीक्षक धोंडू वाणी, माजी नगराध्यक्ष हरीष गणवानी, अॅड.योगेश गजरे, दिलीप कांबळे, काझी, डी.डी.वाणी, नितीन पाटील, भास्कर पहेलवान, अॅड.लक्ष्मीकांत शिंदे, विजय पाटील, अशपाक शेख आदींसह शांतता कमेटी सदस्य उपस्थित होते.