दुर्दैवी: नाशिकजवळील अपघातातील मृतांची संख्या २५ वर!

0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात काल मंगळवारी झालेल्या बस आणि रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा आता 25 वर गेला आहे. काल १० जण ठार झाले होते. उपचारादरम्यान जखमींचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 33 जण जखमी आहेत. अपघात इतका भीषण होता कि दोन्ही वाहने शेतातील विहिरीत जाऊन पडले. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अपघातातील जखमींवर सध्या मालेगावात तसेच इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तर रिक्षामधील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत केली जाईल असे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.