दुर्धर आजारापुढे हात टेकत वयोवृद्धाने कवटाळले मृत्यूला

An elderly man of Manvel committed suicide due to illness यावल : आजाराला कंटाळून 70 वर्षीय वयोवृद्धाने आत्महत्या केल्याची घटना यावल तालुक्यातील मनवेल येथे गुरुवार, 13 रोजी दुपारी घडली. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गोवर्धन बळीराम भालेराव (70) असे मयताचे नाव आहे.

दोरीच्या सहाय्याने घेतला गळफास
गोवर्धन भालेराव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते मात्र दुर्धर आजाराने त्रस्त होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे घरातील सदस्य शेतात कामाला गेल्यानंतर गोवर्धन नातीसोबत घरीच असताना त्यांनी नातीला चहा बनवण्यास सांगितले व घराशेजारी असलेल्या लाकडी सर्‍याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परीवार आहे. मयत गोवर्धन भालेराव यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. दगडी गावाचे पोलीस पाटील विठ्ठल गोरख कोळी यांनी खबर दिल्यावरून यावल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.