शहादा । भारतातीलच नव्हे तर इतर 65 देशाच्या दुर्मिळ नाणी चलनातील नोटा, तिकीट यांच्या अलौकिक संग्रह हा युवा पिढीसह सर्वांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केले.दाऊदी बोहरा समाजाच्या ईद मिलादनिमित्त हरियाअली संस्थेचा वतीने दुर्मिळ अश्या पोस्टर्स प्रदर्शनांचे उदघाटन डॉ.कलशेट्टी यांचा हस्ते झाले.यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावीत,वनश्री हैदरआली नूराणी,दि शेगाव अग्रेसेन पतंसस्थेचे चेअरमन नूर नूराणी उद्योगपती तैय्यब नुराणी, माजी उपनगराध्यक्ष यूनूस बागवान,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, श्री महाविर पतसंस्थेचे संचालक राजाराम पाटील,महेश पाटील, साजीद अन्सारी, तहसिलदार मनोज खैरनार, नायबतहसिलदार डॉ.उल्हास देवरे उपस्थित होते.
पुरातन काळातील वस्तुंची आवड
हैदरभाई नूरानी यांनी म्हटले की,स्वातंत्र्यपुर्वी काळापासूनची टपाल तिकीटे आहेत. यात हैद्राबादचे निजाम,इंदोरचे होळकर,टीपु सुलतान,बहादुर शहा जफर यांच्या काळातील चलनी नाणी निसर्गाची संबंधित असलेली चिन्हाची तिकीटे,1930 पासून टपाल तिकीटे,मदर तेरीसा,अभिनेञी मधुबाला, लोकमान्य टिळक यांच्या दुर्मिळ प्राण्यांची तिकीट हे सर्व नव्या पिढीला मार्गदर्शक व ज्ञानात भर टाकणारे असणार आहे.