दुर्मिळ नाण्यांची माहिती व प्रदर्शन

0

पुणे । आयसीएसआरआयतर्फे 22व्या ‘कॉईनेक्स पुणे 2017’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दुर्मिळ नाण्यांची खरेदी-विक्री करण्याची ही संधी 15 ते 17 डिसेंबर दरम्यान सोनल हॉल येथे उपलब्ध होणार असल्याची माहिती या संस्थेचे अधुक्षा टोले यांनी दिली आहे.

इ. स. पूर्व 500 ते आजतागायत अशा नाण्यांचे हे प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनात प्राचीन, मुघल, नजराणा, एरर अशा दुर्मिळ नाण्यांची वैविध्यता बघायला मिळणार आहे. तसेच यानिमित्या तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या नाण्यांची ओळख, अंदाजे किंमत, वर्ष, इतिहास, त्यावरील अक्षरे, चित्र ठसे याविषयीची मार्गदर्शनपर माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेता येणार आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील सोने-चांदी आणि तांब्याचे होन हे प्रमुख आकर्षण असणार आहे.या प्रदर्शनीचे उद्घाटन ज्येष्ठ नाणकशास्त्र तज्ज्ञ आणि प्रसिद्ध नाणक संग्राहक प्रशांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. नाणक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल नाणक संग्राहक अरविंद आठवले, लखनऊ येथील नाणक संग्राहक रण विजय सिंग यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान ‘कॉईनेक्स पुणे 2017’वर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यात संग्राहकांच्या 70 फ्रेम्स आहेत.