दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन

0

राजगुरुनगर । मराठी भाषा गौरवदिनानिमित्त राजगुरुनगर येथील सार्वजनिक वाचनालयात मंगळवारी 1832 ते 1900 सालापर्यंत प्रकाशीत झालेल्या दुर्मिळ पुस्तकांचे व हस्तलिखितांंचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव राजेंद्र सुतार यांनी दिली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन खेडचे तहसीलदार सुनील जोशी यांच्या हस्ते होणार आहे. ब्रिटीशकाळात 153 वर्षांपूर्वी स्थापन झालेली 50 दुर्मिळ पुस्तके व दोन हस्तलिखितांंचा यात समावेश आहे. सकाळी 10.30 ते सायंकाळी ते 7 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.