दुषित व दुर्गंधयुक्त पाणीपुरवठ्याची समस्या कायम

0

जळगाव। शहरातील दुषित व दुर्गंधयुक्त पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. शहरातील अनेक भागात दुषित पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आपल्या घरी सानेगुरुजी नगर परिसरातील नागरिकांनी दुषित पाण्याच्या बाटल्या ठेवल्याची माहीती नगरसेवक अनंत जोशी यांनी दिली. स्थायी सभेत आयुक्तांनी आश्वासन देवून देखिल पाण्याचे नमूने घेण्यासाठी बोलविले नसल्याचेही जोशी यांनी सांगीतले.

अनेक भागात दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून अनेक भागात पिवळ्या रंगाचा व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. यावर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे मनपाच्या स्थायी सभेत मनसेने अनंत जोशींसह सदस्य आक्रमक झाले होते. यावर आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी)च्या अभियंत्यांकडून जलशुद्धिकरण प्रकल्पाची पाहणी करून तातडीने उपायोजना करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले होते.

जलशुध्दी प्रकल्पाची पाहणी करणार
सानेगुरुजी नगरातील सीए सुनिल ललवाणी यांनी त्यांच्याकडे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने त्या पाण्याचे नमूने बाटलीत भरुन माझ्या घरी आणले होते. अशी माहीतीही आज अनंत जोशी यांनी दिली. यापुढे प्रशासनाने उपाययोजनांसाठी पावले न उचलल्यास मनसेकडून जलशुध्दीकरण प्रकल्पाची तपासणी केली जाईल. तसेच पाणीप्रश्नी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखिल जोशी यांनी दिला आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांनी त्यावेळी शहरातील विविध भागातून पाण्याचे नमून घेवून त्यांची तपासणी केली असता, ते पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आल्याची माहीती दिली. आयुक्तांनी पाणी पुरवठाविभागाला नगरसेवक जोशी यांना नमूने घेण्यासाठी सोबत नेण्याच्या सूचना दिल्या होत्या. आठवडा होवूनही नमुने तपासण्यात आले नाही.

वाटर बेडची वाळू जुनीच
महपालिकेच्या जलशुध्दीप्रकल्पात वाटर बेडमधील वाळुसह फिल्टरचे साहीत्य काही वर्षात बदल करणे आवश्यक असत. गेल्या अनेक वर्षात या बेडमधील वाळू बदलली नसल्याच्या आरोप देखिल अनंत जोशी यांनी केला आहे.