जळगाव: आज जगभरात रमजान ईद साजरी केली जात आहे. जळगाव शहर व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. ठीकठिकाणी सामुदायिक नमाज पठण झाले. आज बुधवारी (5 जून) सकाळपासूनच मुस्लिम बांधवांचे जथ्थेच्या जथ्थे नमाजपठणासाठी जात आहे. महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळाचे सावट असल्याने, हा दुष्काळ दूर होण्यासाठी चांगल्या पावसासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच शांतता व सलोख्यासाठी नमाज अदा करण्यात आली. रमजान ईदची मुख्य नमाजपठण झाल्यानंतर ईदचा जल्लोष व उत्साह आढळून आला.