दुष्काळात सरकारने राजकारण केले ; धनंजय मुंडेंकडून स्थगन प्रस्ताव

0

मुंबई: राज्यात भीषण दुष्काळ असून दुष्काळ निवारणात सरकार सपशेल अपयशी ठरली आहे. दुष्काळ निवारणात सरकारने राजकारण केल्याचे घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. विधान परिषदेत दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली. यावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांनी घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज पाच मिनिटासाठी स्थगित करण्यात आले.

दुष्काळात चारा छावणी सुरु करतांना सरकारने चाचक अटी लादल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले, असे आरोप मुंडे यांनी केले.