मुंबई-विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचे दोन दिवस शिल्लक आहे. आज विधानसभेत दुष्काळावर चर्चा घेण्यात आली. मात्र यावेळी विरोधी पक्षातील सदस्य मोठ्या प्रमाणत गैरहजर होते. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु असतांना विरोधक गैरहजर असल्याने दुष्काळावर चर्चा करण्याची विरोधकांची मानसिकता नाही अशी टीका केली.
विधानसभेत २९३ अन्वये दुष्काळावर चर्चा घेण्यात आली. भाजपचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी यावर मत व्यक्त केले. आमदार डॉ.अनिल बोंडे बोलत असतांना माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी डॉ.बोंडे यांना थांबविले व दुष्काळासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा करतांना विरोधी पक्षाचे आमदार देखील उपस्थित हवे, सभागृहनेते यांनी विरोधकांना बोलवून घ्यावे अशी मागणी केली.
यावर सभागृहनेते गिरीश बापट यांनी विरोधी पक्षातील आमदारांना निमंत्रण पाठवीत असल्याचे सांगितले.