दुष्काळावर चर्चा करण्यासाठी शरद पवार आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

0

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी भागातील दौरा केला असून आज संध्याकाळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. वर्षा निवासस्थानी जाऊन शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. दुष्काळी परिस्थिती पाहणी शरद पवार यांनी केली असून उपाययोजनाबाबत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. रात्री आठ वाजता ही बैठक होणार आहे.

शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत पत्र लिहून चर्चेसाठी वेळ मागितली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी वेळ दिली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपली असून नेते दुष्काळी भागाची पाहणी करत आहे. दरम्यान शरद पवार यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली असून त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.