दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ-मोदी

0

अहमदनगर- साईबाबा समाधी शताब्दी उत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी आणि पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घराची चाबी देण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये आले आहेत. शिर्डी साई संस्थानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी यावेळी बोलतांना महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या छायेत आहे, दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ असे आश्वासन दिले.

यावेळी त्यांनी चार वर्षात सरकारने १ कोटी २५ लाख घरे बांधली असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी यावेळी कॉंग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. कॉंग्रेसच्या काळात ४ वर्षात फक्त २५ लाख घरे बांधण्यात आली असे त्यांनी सांगितले.

घर देण्याचे प्रयत्न यापूर्वी सुद्धा झाले पण गरीबांना घर देऊन त्यांना सशक्त करण्याऐवजी एका कुटुंबाचे हित संभाळण्यात रस होता. वोट बँक तयार करण्याचा उद्देश होता असे आरोप मोदींनी अप्रत्यक्ष कॉंग्रेसवर केले.