मुंबई: राज्यातील दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सर्व शुल्कांसह संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात नवा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयानुसार प्रात्यक्षिक, गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र या शुल्कांसह परिक्षा फीचाही समावेश असणार आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.