महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
रावेर- तालुक्यात शेतकर्यांना दुष्काळी निधी वितरण प्रकरणाचा आढावा घेत आहे. येत्या दोन-तीन दिवसात यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दै.‘जनशक्ती’शी बोलतांना सांगितले. त्यामुळे दिरंगाई कुणी केली याचा आढावा आता सुरु झाला आहे. तालुक्याला शासनाने कोट्यावधी रूपयाचा दुष्काळ निधी देऊन सुध्दा संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्ष करीत राहिले व वाटप करण्यात विलंब केला म्हणून आज या विषयावर महाराष्ट्र शासन लक्ष ठेवून असून प्रशासन त्वरित निधी वर्ग करीत आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसानंतर दिरंगाई करणार्या कोणत्या अधिकार्यांवर कारवाई होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
यांनी केली दिरंगाई
बँकेत निधी वर्ग केला म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. जरी दुष्काळी कामाचा ताण तहसीलदारावर असला तरी तहसीलवर सुपरव्हिजन करणारे व उटसूट रावेराला ठाण मांडून बसणारे फैजपूरचे प्रांताधिकारी याला जबाबदार धरले जाण्याची शक्यता आहे. कारण या कोट्यवधी रुपयांचा दुष्काळ निधीचा साधा पाठपुरावा दोघांपैकी कोणीही घेतला नाही. म्हणून बँक कर्मचारी बिनधास्त राहिले. या सर्व मंडळींनी निष्काळजीचा चक्क कळसच गाठला असून या प्रकरणाची दखल खुद्द महसूलमंत्र्यांनी घेतल्याने आता दोषींवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.