दुष्काळ हेच भारताचे दर्दैव; पुरांमुळे 8 पटींनी वाढले

0

जळगाव। दुष्काळ फक्त महाराष्ट्रातच नाहीतर पूर्ण भारतात आहे, बिकट परिस्थिती आहे. पुरांमुळे पडणार्‍या दुष्काळाचे प्रमाण 8 पटींनी वाढले आहे. पाऊस आला की नदीतीलमाती पुराचे पाणी घेऊन जाते. त्यामुळे नद्यांचे पात्रातील थर उंचावल्यामुळे दुष्काळ वाढत आहेत दुष्काळ निवारण्यासाठी महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. हे मॉडेल भारतातच नव्हे तर जगात उत्कृष्ट असल्याचे मत जागतिक जलतज्ञ राजेंद्रसिंह यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पाणी परिषद व स्वच्छ भारत अभियान कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना व्यक्त केलेे.

नेत्यांसह अभ्यासकांची उपस्थिती
या पाणी परिषदेत मार्गदर्शक डॉ.माधवराव चितळे, पोपटराव पवार, भारत पाटील (कोल्हापूर) यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ.एकनाथराव खडसे, खा.ए.टी.पाटील, खा.रक्षा खडसे, कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर नितीन लढ्ढा, आ.स्मिता पाटील, आ.हरिभाऊ जावळे, आ.चंद्रकांत सोनवणे, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आ.संजय सावकारे, आ.किशोर पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर , जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्ह्यातील ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते. पाणी परिषदेचे उद्घाटन कळ दाबून पाण्याच्या फवार्‍यांनी जागतिक जलतज्ञ राजेंद्रसिंह याच्या हस्ते झाले.

महाराष्ट्रात बुध्दीवादाचा दृष्काळ
जलतज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले की, महाराष्ट्रात सरकारने 300 कोटी व नागरिकांनी 350 कोटी जलयुक्त शिवार योजनेसाठी दिले तरीसुध्दा गेल्या वर्षात काम समाधानकारक झाले नाही. राजस्थानमध्ये जमिनीच्यावर व जमिनीच्या खाली पाण्याचे नियोजन करण्याचे काम करणारे अशिक्षित लोक जाणकार होते. मात्र आपण आज निसर्गाकडून मिळणार्‍या पाण्यावर आपण विश्‍वास कमी ठेवतो आणि जमिनीतून पाणी काढतो. हा विचार करीत नाही की, जमिनीच्या आतील साठा कमी होत आहे. आम्ही राजस्थानमध्ये नियोजन करून विहिरी पाणीदार केल्या . तुमच्याकडे शेताच्या बांधावरील झाडे तोडतात मात्र, राजस्थानात झाडांसह शेती करतात.आम्ही निसर्गाबरोबर असल्याने आमच्याकडील शेतकरी आत्महत्या करीत नाही. महाराष्ट्रात पैसा जास्त, पाणी जास्त व शेतकरी आत्महत्याही जास्त झाल्या आणि होत आहेत महाराष्ट्रात बुध्दीवादाचा दृष्काळ आहे. तो संपवावा लागेल.

जलचक्र, पिकचक्र बदलणे आवश्यक
भारतात शिक्षणपध्दतीने एवढे चांगले पाण्याचे व्यवस्थापन संपवलेे आहे. राज्यात चार काम केलीत तर दुष्काळ राहणार नाही. एकत्र काम करा, मोजमाप तंत्रशुध्द पध्दतीने करो, कमी श्रमात चांगले कामाचे नियोजन करा, जेवढे पाणी घेतो तेवढे पाणी परत द्या. मराठावाड्यात वर्षाचक्र, मातीचक्र, पिकचक्राचे नियोजन नाही. त्यामुळे दृष्काळ आहे. पाणीदार बनण्यासाठी जलचक्र व पिकचक्र बदलणे आवश्यक आहे. केंद्राकडून आम्ही एक रूपयाही घेतला नाही. महाराष्ट्रात स्वयंसेवक म्हणून जलयोध्दा 48, जलदूत-2 हजार व जलसेवक 68 हजार सोबत घेऊन काम करणार आहे, असेही ते म्हणाले.