नवापूर: शहरातील दुमजली इमारतीवरून पाय निसटल्याने महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे
नवापूर शहरातील तलाठी कार्यालया जवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना पाय निसटल्याने महिला कामगाराचा मुत्यु झाला. महिला दुसऱ्या मजल्यावर काम करत होती.
सकाळी अकरा वाजेच्या सुमारास असद अली यांच्या मालकीच्या बिल्डिंगचे बांधकाम करत असताना गवंडी सोबत उर्मिला दिलीप गावित राहणार करंजीखुर्द तालुका नवापूर ही कामगार महिला काम करत होती अचानक दुसऱ्या मजल्या वरून पाय निसटल्याने खाली पडली.त्यात ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती शेजारी महालक्ष्मी गारमेंट्स कापड दुकानाचे मालक राहुल मराठे यांनी समय सुचकता दाखवत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परन्तु उपचारा दरम्यान सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली असून नवापूर पोलीस उपजिल्हारुग्णालयात दाखल झाले होते. पुढील कारवाई सुरू आहे
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
घटने मुळे गवंडी सोबत काम करणाऱ्या कामगाराचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून आले आहे. संबंधित ठेकेदारां कडून सुरक्षेची कोणतीही साधने पुरवली गेली नसल्याचे निदर्शनात आले. कामगाराचा विमा उतरवणे ठेकेदाराला बंधनकारक असतांना असे काही केलेले दिसून आले नसल्याचे बोलले जात आहे