दुसर्‍यांसाठी जगतोच पण स्वत:साठीही वेळ काढला पाहिजे

0

जळगाव । महिलांनी आपला खर्च भागविण्यासाठी नवर्‍याची वाट पाहूनये तर, स्वत: च्या पायावर उभे रहावे़ तसेच दुसर्‍यासाठी तर जगतोच पण स्वत:साठी वेळ काढता येत नाही, त्यामुळे स्वत:साठी वेळ काढला पाहिजे असे मत अभिनेत्री सई ताम्हणकर हिने व्यक्त केले. भरारी फऊंडेशन आयोजित बहिणाई महोत्सवानिमित्त वृत्तनिवेदनक विशाल जाधव यांनी सईची प्रकट मुलाखत घेतली, यावेळी ती बोलत होती. दरम्यान, सईची एंट्री होताच तरूणांनी एकच जल्लोष केला. गाडी थेट व्यासपीठाजवळ नेण्यात आली.

प्रेमामुळेच दुनिया कायम
भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी व सदस्यांनी सन्मानपत्र देऊन सई ताम्हणकरचा सत्कार केला़. चित्रकला स्पर्धेतील विजेते निलेश शिंपी, अंकिता राणे, पियुष बडगुजर व हर्षाली कोळी, काजल बैसाने, रितु बन्सल, वैशाली कोळी, अतुल बारी, चंद्रकांत कोळी, आनंद माळी यांना यावेळी सईच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे सई ताम्हकणकर यावेळी म्हणाली. मला लहानपणापासून फॅशन जगताची ओढ होती असे म्हणत तीने रॅम्प वॉक करुन दाखविला़ प्रेमामुळेच दुनिया कायम असल्याचे सांगत जीव थोडा थोडा झुरतो हरवूनी तुझ्या मागे मागे फिरते हे गाणेही सादर केले.