दुसर्‍याच्या हद्दीत घुसून प्राधिकरणाने पाडली घरे

0

गुंडशाही कारवाईमध्ये पोलिस यंत्रणेचाही दुरुपयोग
घर बचाव संघर्ष समितीचा आरोप

पिंपरी-चिंचवड : स्वतःचे क्षेत्र सोडून दुसर्‍या स्वायत्त संस्थेच्या हद्दीत घुसून घरे पाडण्याचा मर्दुमकी प्राधिकरण प्रशासनाने केल्याचे घर बचाव संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे उघड झाले, असा आरोप समिती एका पत्रकात म्हटले आहे.

वापरातील वस्तुंसह घरे जमीनदोस्त
पत्रकात म्हटले आहे, मागील वर्षी म्हणजेच मे 2017 रोजी कोकणे चौक ते काळेवाडी फाटा दरम्यान एचसीएमटीआर 30 मीटर रस्ता रुंदीकरणच्या कारणास्तव काही घरांवर सदरची बेकायदा कार्यवाही प्राधिकरण प्रशासनातर्फे करण्यात आली. रहिवासी नोंद असलेल्या रहाटणी परिसरातील सर्व्हे नं 25, 28 मधील नागरिकांना घरात घुसून बाहेर काढण्यात आले. पोलीस यंत्रणेचा वापर बळासाठी करण्यात आला. वापरातील वस्तूंसह सदरची घरे जमीनदोस्त करण्यात आली. याची सत्यता तपासून पाहण्यासाठी घर बचाव संघर्ष समितीने पालिका आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे सातत्याने कागदोपत्री पाठपुरावा केला. त्यामुळे सदरची धक्कादायक बाब उघडकीस आली.

निदर्शनास आलेल्या बाबी
1. सन 1997 च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात स्पष्टपणे उल्लेखलेले आहे की रहाटणी काळेवाडी चा भाग, सर्वे नं.25,28 ( एचसीएमटीआर आरक्षित असलेला भूभाग ) पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतून वगळण्यात आलेला आहे.
2. पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या रहाटणी सर्व्हे नं. 25 च्या भाग नकाशामध्ये स्पष्टपणे प्राधिकरण आणि महापालिका हद्दीचें डीमारकेशन देण्यात आलेले आहे.पिवळा भाग रहिवाशी असून पालिका हद्दीतील आहे.आणि पांढरा लाल रेषेमधील भाग प्राधिकरण हद्दीतील आहे.
3. असे असताना पोलीस विभागाला (वाकड पोलीस ठाणे) खोटी