जळगाव। एमआयडीसी पोलिसांचे शनिवारी सकाळी गस्तीवर असतांना त्यांना गुरांनी भरलेला 407 ट्रक औरंगाबाद कडे भरधाव वेगात जातांना दिसला. ट्रकचालकास थांबण्यास सांगून देखील तो न थांबता भरधाव वेगात निघून गेला.
अखेर पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून चिंचाली गावाच्या गेटजवळ पकडला. यात सहा म्हशी कोंबून भरलेल्या मिळून आल्या. पोलिसांनी म्हंशीची सुटका करत त्यांची अंहिसातिर्थ या गोशाळेत उपचारार्थ रवागनी केली. तर ट्रक ताब्यात घेतला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचा केला पाठलाग
एमआयडीसीचे पोलिस कर्मचारी अविनाश बाबुराव देवरे व परिस जाधव हे शनिवारी सकाळी आर.एल.चौफुलीजवळ गस्तीवर असतांना त्यांना 407 ट्रक (क्रं.एमएच.04.डीडी.6231)मधून गुरं भरून जातांना दिसला. यावेळी ट्रकचालकास थांबण्यास सांगितल्यावर चालकाने ट्रक न थांबवता भरधाव वेगात ट्रक औरंगाबादकडे निघून गेला. पोलिसांना गुरांची अवैध वाहतुकीचा संशय आल्याने त्यांनी ट्रकचा पाठलाग केला. अखेर पोलिसांनी ट्रक चिंचाली गावाजवळील एका हॉटेजवळ अडवला.
औरंगाबाद येथे गुरे घेऊन जात होता चालक
407 ट्रकची तपासणी केली असता त्यांना त्यात सहा म्हशी जखमी असस्थेत मिळून आल्या. यानंतर अविनाश देवरे आणि परिस जाधव यांनी टक्रचालकास ताब्यात घेत त्याचे नाव विचारले असता त्याने अरविंद दत्तु चित्ते (वय-27 रा. एरंडोल) असे नाव सांगितले. यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर म्हशी ह्या समदखान मेहमुद खान रा. एरंडोल यांच्या मालकीची असल्याचे सांगितले. तर ही जनावरे औरंगाबाद येथे कत्तलीसाठी घेवून जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी लागलीच ट्रक व चालकास ताब्यात घेवून म्हशींना उपचारार्थ गो-शाळेत पाठविली. याप्रकरणी पोकाँ. अविनाश बाबुराव देवरे यांच्या फिर्यादीवरून अरविंद दत्तु चित्ते याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूग्णवाहिकेतून झाली होती गुरांची वाहतूक
अजिंठा चौफुलीकडून भरधाव जाणार्या रुग्णवाहिकेने (क्र. एमपी-04-डीबी-1752) एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर आर. एल. चौफुलीकडून येणार्या रिक्षाला (क्र. एमएच-19-व्ही-6769) जोरदार धडक दिल्यानंतर आर.एल.चौफुलीजवळ असलेले गतिरोधक ओलांडताना रुग्णवाहिकेचे पुढचे टायर फुटल्याने रूग्णवाहिकेतून गुरांची अवैध वाहतुक होत असल्याचे शुक्रवारी समोर आले होते. यानंतर आज दुसर्या दिवशी देखील 407 या वाहनातुन गुरे वाहून नेणार्यास पोलिसांनी पकडले आहे.