धुळे । शहराच्या देवपूर भागात पॉश कॉलनीत पिता-पुत्राच्या हत्त्येनंतर दुसर्यादिवशीही धुळ्यात दहशत कायम दिसत होती. दोघांच्या हत्त्येप्रकरणी आठ संशयितांविरूद्ध पश्चिम देवपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मयत रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्या पार्थिवाचे दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शवविच्छेदन गृहाजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. स्वतः डीवायएसपी सचिन हिरे, देवपूर पश्चिमच्या एपीआय सरीता भांड या घटनास्थळी हजर होत्या.
पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल
सरस्वती कॉलनी, दत्तमंदिर देवपूर, धुळे येथे राहणार्या प्रशांत दगाजीराव पाटील (वय-44) यांनी पश्चिम देवपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाचा राग मनात धरुन 8 जून रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास देवपुरातील बोरसे नगरजवळ गौरव बाजीराव पवार (रा. गल्ली नं.6, धुळे), जयराज पाटील, ऋषीकेश पाटील (दोघे रा. बोरसे नगर, देवपूर, धुळे), वैभव सोनू पवार (रा. अभियंतानगर देवपूर, धुळे), हर्षल उर्फ दादू रवींद्र पाटील, भूपेश वाल्मीक पाटील (दोघे रा. वलवाडी देवपूर, धुळे), भूषण बाबुराव कापकर (रा. फुले कॉलनी, शाहू नाट्यगृहाजवळ पारोळा रोड, धुळे) यांनी तलवार, कुकरी, कोयता आणि घाव या शस्त्रांचा वापर करुन रावसाहेब दगाजीराव पाटील (वय-54) व त्यांचा मुलगा वैभव पाटील (वय-21) दोघे (रा.सरस्वती कॉलनी), हरिष अनिल शिंदे, नितेश देवरे या चौघांवर हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील यांचा शुक्रवारीच मृत्यू झाला, तर हरिश शिंदे आणि हितेश देवरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या फिर्यादीमध्ये बाजीराव उर्फ सुभाष सजन पवार (रा. ग.नं.6, धुळे) हा संशयित कटाचा सूत्रधार असून त्याने गुन्ह्याचा कट रचून इतर आरोपींना चिथावणी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस बंदोबस्तात झाले शवविच्छेदन
8 रोजी सारंकाळी झालेल्रा वानखेडे नगरातील पिता-पुत्र हत्राकांडानंतर अज्ञात आरोपी फरार झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धडपकड सुरु केली. बाजीराव पवार, गौरव पवार, जयराज पाटील, हर्षल पाटील या चौघा संशयितांना अटक केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र फरार आरोपींमधील ऋषीकेश पाटील(वर 22, रा.वानखेडे नगर), वैभव पवार(वर 26, देवपूर) रांना जळगाव शहरात जेरबंद करण्रात आले. दरम्रान बाप-बेट्याच्या हत्त्येनंतर दुसर्या दिवशीही धुळ्यात दहशत कायम असल्याचे चित्र दिसत होते. रावसाहेब पाटील आणि वैभव या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. शनिवारी दुपारी त्यांचे शवविच्छेदन झाले.