दुसर्‍या दिवशी आव्हाणेत तणावपूर्ण शांतता

0

जळगाव । आव्हाणे येथे रविवारी सायंकाळी 6.45 वाजता पूर्ववैमनस्यातून तसेच शेतात बकर्‍या व गुरे चरायला नेल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन तुफान दगडफेक झाली होती. त्यात दोन्ही गटाचे 10 ते 12 जण जखमी झाले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही गटाने दिलेल्या फिर्यादीवरून परस्पर विरोधी दंगलीचा आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 9 संशयिताना अटक केली आहे. सोमवारी गावात तणावपूर्ण शांतता होती.

गावात तणावाचे वातावरण…
आव्हाणे गावात रविवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर सोमवारी गावात तणाव पूर्ण शांतता होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सोमवारी भीती आणि तणावाचे वातारवरण होते. गावातील प्रत्येक चौकात गटा गटाने ग्रामस्थ बसले होते. दंगलीच्याच संदर्भात सर्व कुजबूज सुरू होती. दंगल नियंत्रण पथक तसेच तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचार्‍यांचा गावात बंदोबस्त होता. तसेच आव्हाणे फाट्यावरही पोलिसांचा बंदोबस्त होता. गावात येणार्‍या प्रत्येकाची पोलिस आडवून चौकशी करीत होते. त्यानंतरच गावात प्रवेश दिला जात होता.

महिलांना मारहाण नको…
आव्हाणे येथील एका गटाने गल्लीत येऊन महिला आणि लहान मुलांना मारण्याची काय गरज होती. किरकोळ कारणावरून एवढी मारहाण करायला नको होती. तसेच कुर्‍हाडी, तलवारीने हल्ला करून अनेकांना जखमी केल्याचाही आरोप एका गटाने केला.

बाहेरच्यांची काय गरज…
दुसर्‍या गटाने गावातील भांडणे होती. तर जळगाव शहरातील तरूणांना बोलावण्याची गरज नव्हती. गावातील भांडणे गावातच सोडवता आली असती. मात्र बाहेरचे तरूण आल्याने वाद चिघळल्याचा आरोप दुसर्‍या गटाने केला. पोलिसांनी बाहेरून आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या तरूणांवरही कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.

गुरे चारण्यावरून झाला वाद…
दुसर्‍या गटाने दिलेल्या फिर्यादीत शेतात बकर्‍या व गुरे चरायला नेल्याच्या कारणावरून वाद होऊन हाणामारी झाल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात दत्तात्रय तुळशीराम पाटील (वय 58) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंटी उर्फ जोंगेंद्र अरुण साळुंके, उमेश जगन सपकाळे, शिलाबाई अरुण सपकाळे, अरुण गोंविदा सांळुके, राजु चिंतामण सपकाळे, प्रकाश अशोक सुरवाडे, अनिल पानाचंद भालेराव, संजय भिका सपकाळे, राजेंद्र कालिदास सोनवणे यांच्या विरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यातील 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांनी गावातील काही संशयितांवर कलम 110 प्रमाणे कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील सनील भालेराव (वय 29), संजय सपकाळे (वय 25) आणि राजेंद्र सोनवणे यांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली होती. त्यांना सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 7 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. निखील कुलकर्णी यांनी तर संशयितातर्फे अ‍ॅड. कुणाल पवार यांनी कामकाज पाहिले.

तालुका पोलिसात गुन्हा दाखल
तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोंगेंद्र अरुण साळुंके (वय 27) यांच्या फिर्यादीवरून अमोल गोकूळ पाटील, देवेंद्र दत्तात्रेय पाटील, गोकूळ तुळशीराम पाटील, प्रल्हाद तुळशीराम पाटील, दत्तात्रेय तुळशीराम पाटील, प्रतिक उर्फे बापू प्रल्हाद पाटील या सहा जणांविरुध्द सोमवारी अतिरीक्त सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी 8 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. महाजन यांनी कामकाज पाहिले.

जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन : आव्हाण्यात रविवारी झालेल्या हाणामारीच्या घटनेत दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अश्या मागणीचे निवदेन दलित बांधवांतर्फे सोमवारी जिल्हाधकारी किशोरराजे निबांळकर यांना देण्यात आले. यावेळी आव्हाणे गावातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हधिकार्‍यांना दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, जोगेंद्र साळुंखे, उमेश सपकाळे हे गावातून जात असतांना अमोल पाटील व देवेंद्र पाटील यांच्यासह दोन जणांनी त्यांची दुचाकी अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर मारहाण केली. यानंतर कुटुंबियांना माहित पडल्याने सदर घटनास्थळी लगेच पोहोचले. जोगेंद्र साळुंखे यांच्या आई शिलाबाई साळुंखे तसेच वडील अरूण साळुंखे यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला करण्यात आला. यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे समाजाला प्रशासनाच्यावतीने संपूर्ण संरक्षणे पुरविण्यात यावे तसेच आमच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.