दुसर्‍या दिवशी तणावपूर्ण शांतता

0

जळगाव । शहरातील कोळीपेठ परिसरात गुरूवारी दुपारी रिक्षा कट लागल्याने झुंझार बहुउद्देशीय मंडळाच्या मंडपला धक्का लागून श्रीं ची मूर्ती विटंबणा होवून मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर रस्त्यावर उतरला होता. यामुळे तणाव निर्माण झाला होता. दोन तास कार्यकर्त्यांची समजूत व गुन्हा दाखल केल्यानंतर जमाव शांत झाला होता. तर आज शुक्रवारी दुसर्‍या दिवशीही कोळीपेठेत तणावपुर्ण शांतता दिसून आली. रात्रीपासून दंगा नियंत्रण पथकासह पोलिस अधिकारी त्या ठिकाणी ठाण मांडून होते. दुपारी अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची एक दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात येवून पोलिस इतर तीन संशयितांचा शोध घेत आहेत.

अशी घडली घटना
गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता शेख आसिफ शेख अजुमुद्दीन हा रिक्षा घेवून कोळीपेठेकडे येत होता. नाल्याच्या पूलाजवळ झुझांर बहुद्देशीर मंडळाने गणपतीची स्थापना केली आहे. रिक्षाचा धक्का त्या मंडपाला लागल्याने मूर्ती हललल्याने ती भंगली. याचा जाब मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विचारल्याने रिक्षाचालक आसिफ व त्यांच्या शाब्दिक वाद झाला. त्यानंतर त्या कुंटुंबातिल शेख अजुमुद्दीन शेख गुलाम हुसेन, शेख वसीम शेख अजुमुद्दीन, शेख यासिन शेख अजुमुद्दीन यांनीही वाद झातला. हा वाद विकोला गेला. त्यानतंर श्रीं ची मूर्ती भंगल्याची वार्ता पसरल्याने घटनास्थळी संतप्त मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जमाव झाला. घटनास्थळी आक्रमक जमाव झाल्याने शनिपेठ पोलिस तात्काळ पोहचले. त्यांनी जमावला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश न आल्याने डिवायएसपी सचिन सांगळे, दंगा काबू पथक, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे हे देखिल तेथे आलेत. यानंतर समजूत घातल्यानंतर मृर्तीचे विसजून करण्यात आले.दुपारी साडेतीन वाजता निर्माण झालेला तणाव सायंकाळी साडेपाच वाजता निवळला.

एक दिवसांची पोलिस कोठडी
याप्रकरणी गोपाळ कैलास सैंदाणे (रा. बालाजी पेठ) यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात याप्रकरणी 8 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यातच पोलिसांनी लागलीच रिक्षाचालकासह त्याच्या कुंटुबातील चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यात शेख अजुमुद्दीन गुलाम हुसेन, शेख आसिफ शेख अजुमुद्दीन, वसिम शेख अजुमुद्दीन व शेख रासीन अजुमुद्दीन यांना अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पाचवा संशयित तनविर शेख करीम यास पोलिसांनी अटक केली. दरम्यान, दुपारी या पाचही संशयितांना न्यायाधीश एन. के. पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेत न्यायाधीश एन.के.पाटील यांनी पाचही संशयितांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

पोलिस उपअधीक्षकांची पाहणी
गुरूवारी झालेल्या वादामुळे कोळीपेठेत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक प्रविण वाडीले यांनी गस्त घालीत संपूर्ण परिसराची पाहणी केली. शुक्रवारी सकाळी पुन्हा सांगळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. दुसर्‍या दिवशीही कोळीपेठत तणावपुर्ण शांतता असल्याने त्या ठिकाणी शनिपेठ पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक व आरसीपी पथक तैनात आहेत. तर परिसरात कायदा व सुव्यवस्तेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून गणेशउत्सवापर्यंत जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यातच पोलीस इतर तीनही संशयितांचा शोध घेत आहेत.