धर्मशाळा । पाहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 300 धावांच्या आव्हान दिल्यानंतर दुसर्या दिवशी भारताने संयम ठेवत आपली फलंदाजी योग्य पद्धतीने केली आहे. दुसर्या दिवसाच्या खेळ अखेर टीम इंडीयाने 6 गडी गमावत 248 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारत अजून भारत ऑस्ट्रेलियाचे मागे 52 धावांच्या पिछाडीवर आहे. दुसर्या दिवसाखेर रविंद्र जाडेजा (16) आणि वृधमान साहा(10) नाबाद आहेत. लोकेश राहुल (60), चेतेश्वर पुजारा (57) आणि कर्णधार अजिंक्या रहाणे (46) यांच्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारताने दिवसभरात 248 धावा केल्या. मुरली विजय आणि करुण नायर यांनी अनुक्रमे 11 आणि 5 धावा काढत झेल देवून भारताच्या तंबूत परतले. चहापानापर्यंत 153 धावांवर 2 गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला भारताने प्रत्युत्तर दिले.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने घेतली प्रथम फलंदाजी
पहिल्या दिवशी फिरकी गोलंदाज कुलदिप यादवच्या गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला 300 धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाने संघाने कर्णधार स्टीव्ह स्मिथचे शतक (111) तसेच डेव्हिड वॉर्नर (56) आणि मॅथ्यू वेड (57) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या डावात 300 धावा उभारल्या. एकवेळ 1 बाद 144 अशा सुुस्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाची उपाहारानंतर चेंडूचा ताबा घेणार्या कुलदीप यादवच्या फिरकीसमोर अवस्था बिकट झाली. कुलदीपने कांगारूंच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवल्यानंतर कर्णधार स्मिथने एकाकी झुंज देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रविचंद्रन आश्विनने स्मिथचा अडसरही दूर करत भारताला मोठे यश मिळवून दिले. स्मिथ बाद झाल्यावर मॅथ्यू वेडने झुंजार खेळी करत संघाला 300चा पल्ला गाठून दिला. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटीत नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी बघून भारतीय संघात पाच गोलंदाजांचा समावेश करण्यात आला. खांदेदुखीमुळे बाहेर बसलेल्या विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणार्या अजिंक्य रहाणेचा विश्वास गोलंदाजांनीही सार्थ ठरवला. उमेश यादवने सलामीची जोडी फोडली. त्याने सलामीवीर मॅट रॅनशॉला त्रिफळाचीत केले.
सलामीवीर मुरलीनंतर इतरही गेले लवकरच भारताच्या तंबूत
दुसर्या दिवशी भारताची खेळ खराब झाल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 11 धावांवर सलमीवीर मुरली विजयला जलदगती गोलंदाज जॉश हेझलवूडने स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. त्याच्य पाठोपाठ मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि लोकेश राहुलने टिच्चून फलंदाजी करत आणखी विकेट जाणार नाही याची काळजी घेतली. पण चहापाननंतर ही जोडी फोडण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. भारताने पहिल्या सत्रात 64 धावा केल्यानंतर दुसर्या सत्रात धावांचा वेग वाढवला. दुसर्या सत्रात भारताने 89 धावा केल्या. मात्र या सत्रात भारताने लोकेश राहुलच्या रुपात महत्त्वपूर्ण फलंदाज गमावला. कमिन्सने अर्धशतकवीर राहुलला तंबूत पाठवले
यादवने चार घेतले बळी
कर्णधार स्मिथने डेव्हिड वॉर्नरच्या सोबतीने शतकी (दुसर्या गड्यासाठी 134 धावा) भागीदारी करत संघाला सुस्थितीत नेले. ही जोडी भारतीय गोलंदाजांवर डोईजड ठरेल, असे दिसत असतानाच कुलदीप यादव भारताच्या मदतीला धावून आला. कुलदीपने डेव्हिड वॉर्नरला 56 धावांवर असताना बाद केले. वॉर्नर स्लीपमध्ये अजिंक्य रहाणेकडे झोल सोपवून माघारी परतला. त्यानंतर उमेश यादवने शॉन मार्शलाही अवघ्या चार धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. कुलदीपने पीटर हँड्सकॉम्ब आणि मॅक्सवेलचा अडथळा दूर केला तर कर्णधार स्मिथ 111 धावांवर बाद झाला. यादवने चार, उमेश यादवने दोन तसेच आश्विन, भुवनेश्वर आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.