दुसर्‍या फेरीत विष्णू, चित्तेश, जोसेफ विजयाचे प्रमुख दावेदार

0

कोईंबतुर । कोईंबतुरमधील कारी मोटर स्पीडवेच्या ट्रॅकवर शुक्रवारी सुरू झालेल्या 20 व्या जेके टायर एफएमएससीआय राष्ट्रीय रेसींग अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत आघाडी टिकवण्याचे आव्हान गुणतालिकेत अव्वल असणार्‍या रेसरसमोर असेल. चेन्नईची विष्णू प्रसाद आणि जोसेफ मॅथ्यूज यांनी युरो जेके 17 आणि सुझूकी जिक्सझर कप स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सर्व शर्यती जिंकलेल्या असल्यामुळे त्यांची या रेसमध्ये विजेतेपदासाठी मजबूत दावेदारी आहे. कोल्हापूरच्या चित्तेश मंदोडीने एलजीबी फॉर्म्युला फोर शर्यतीत छाप पाडताना सर्वाधिक 30 गुण मिळवले होते. पण, गतविजेता विष्णू घरच्या ट्रॅकवर शर्यत करणार असल्यामुळे चित्तेशला सावध रहावे लागेल अन्यथा त्याच्या अ‍ॅपल कार्टचा पराभव होऊ शकतो.

रेसचा क्रम
जेके टायर रेडबुल रोड टू रुकी कप शर्यतीत श्रीलंकेचा जादेन गुणवर्देना पहिल्या फेरीत अपराजीत राहीला होता. दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाने शर्यत पूर्ण करुनही गुण मिळवण्यात पात्र नसलेला रोझवालचा युवा लालहृऐझेल गुणतालिकेत आघाडीवर आहे. शर्यतीला सुरूवात होईल तेव्हा सगळ्याच्या नजरा विष्णू प्रसादवर असतील. त्याच्या बीएमडब्ल्यू एफबीओ 2 या गाडीवर आरूढ होत विष्णूने सगळ्या शर्यती जिंकत सगळ्यांना चकित केले होते. दुसर्‍या स्थानावर असलेला आदिनाथ रेड्डी आणि नयन चॅटर्जीही चांगल्या तयारीत आहेत.