पुणे । अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी दुपारी जाहीर झाली. या गुणवत्ता यादीत 24 हजार 553 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याना 24 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यत प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली आहे. 6 हजार 889 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असून 30 हजार 734 विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळालेला नाही. यंदा 91 हजार 670 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया घेण्यात येत आहे. दुसर्या यादीत एकूण 55 हजार 287 विद्यार्थी पात्र ठरले होते. यापैकी 24 हजार 553 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून 6 हजार 889 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. तर 30 हजार 734 विद्यार्थ्यांना पुढच्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे. पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. ज्या विद्यार्थ्याना पसंतीक्रम मान्य नसेल अशा विद्यार्थ्यानी तिसर्या प्रवेश फेरीसाठी अर्ज करायचे आहेत.