किंग्जटन: भारत आणि वेस्ट इंडीज संघात कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळविला होता, आता दुसऱ्या सामन्यात ही भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४ गडी बाद १६८ धावांनंतर डाव घोषित केला. यजमान वेस्ट इंडिजसमोर ४६८ धावांचे मोठे लक्ष्य आहे. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विंडिज संघाचा भारताच्या जलदगती गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. तिसऱ्या दिवसाअखेर ४५ धावांवर दोन गडी बाद आहेत. आता विजयासाठी वेस्ट इंडीज संघाला ४२३ धावांची गरज आहे. या सामन्यात भारताकडून बुमराहने चमकदार कामगिरी केली.
भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजला ११७ धावांवर गुंडाळूनही फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ४१६ धावा करणाऱ्या भारताला पहिल्या डावाच्या आधारे २९९ धावांची आघाडी घेता आली. दुसऱ्या डावात सुरुवातीलाच भारताचे तीन गडी बाद झाले. पण नंतर मयंक अग्रवाल आणि राहुलने डाव सावरला. कोहलीला खातंही उघडता आलं नाही. चेतेश्वर पुजाराने ६६ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या. अजिंक्य राहाणे आणि हनुमा विहारीने अर्धशतक ठोकल्याने भारताचा डाव सावरला. भारत ४ गडी बाद १६८ वर पोहोचला. तिसऱ्या दिवसाची वेस्ट इंडिजची सुरुवात ७ गडी बाद ८७ धावांनी झाली. भारताने वेस्ट इंडिजच्या तीन विकेट्स काढल्या. बुमराहने ६ गडी बाद करत सर्वोत्तम कामगिरी बजावली.