दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर !

0

नवी दिल्ली- पहिल्या कसोटीत अतिशय रोमहर्षक सामन्यात ३१ धावांनी विजय मिळवून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आघाडी घेतलेल्या भारतीय संघाची बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीसाठी १३ जणांचा संघ आज जाहिर केला आहे. यामध्ये विजयी संघातील रोहित आणि अश्विनचा समावेश नाही. रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या तिघांचा समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या कसोटीमध्ये रोहित शर्माला चांगली खेळी करता आली नव्हती. अश्विनला अखेरच्या दिवशी विकेट घेताना संघर्ष करावा लागला होता. बुमराह, इशांत, उमेश आणि भुवनेश्वरसह एक फिरकी गोलंदाज असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अंतिम ११ मध्ये कोणाची वर्णा लागते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

पहिल्या कसोटीत पुजाराच्या दमदार फलंदाजी आमि बुमराहच्या गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने विजय मिळवला आहे. चार कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे.

असा आहे संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेद यादव