दुसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप कायम; रुग्णांचे हाल

0

मुंबई : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. काल बुधवारपासून इंटर्न डॉक्टर संपावर आहे. स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी अशी प्रशिक्षणार्थींची प्रमुख मागणी आहे.

अचानक प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेला फटका बसला आहे. आजही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप सुरुच आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात खूप कमी विद्यावेतन दिले जाते. सर्वच राज्यांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना १५ ते ३० हजारांपर्यंत स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन दिलं जातं. मात्र महाराष्ट्रात सर्वात कमी ६ हजार रुपयेच प्रशिक्षणार्थींना दिले जातात.

मंगळवारी अस्मी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेची राज्य सरकारसोबत बैठक झाली, मात्र लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे काल बुधवारपासून त्यांनी संप पुकारला आहे. या संपात बीएमसी हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरही सहभागी असतील.