दुहेरी हत्याकांडातील सहा आरोपींना कोठडी

0

डोंबिवली । शहरातील किशोर चौधरी गोळीबाराला आता वेगळे वळण मिळतेे आहे. या हत्याकांडातील शूटर भोईर पिता-पुत्र चौकडीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले होते. त्यांचे दोन साथीदार आंधळे कुटुंबीय अशा 6 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. या सहाही आरोपींनी किशोरच्या हत्येनंतर किशोरचा साथीदाराला पळवून त्याचीही हत्या केल्याचे समोर आले आहे. या आरोपींना कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चौधरी यांची पत्नी संजीवनी चौधरी यांनी पोलिसांकडून या मारेकर्‍यांना व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला असून आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथके जंग जंग पछाडत होती. त्यानंतर आपण पकडले जाण्यापेक्षा भोईर पिता-पुत्रांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एका बड्या नेत्याने मध्यस्थी केल्याची चर्चा आहे.